नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथील निवुत्त मुख्याध्यापकाने पत्नीच्या स्मरणार्थ उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी करिता ७५ हजाराच पाणी फिल्टर व पाणी कुलिंग यंत्र भेट दिल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्द येथील शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी करिता ७५ हजाराचे पाणी फिल्टर व पाणी कुलिंग यंत्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक सीताराम परशुराम पाटील यांनी त्यांच्या पत्नी कै. शकुंतला सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेस भेट दिली.
या प्रसंगी स्वतः सीताराम पाटील, गावाचे सरपंच अरविंद ठाकरे , उपसरपंच सागर साळुंखे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र मराठे , केंद्र प्रमुख वसंत पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र बागुल, उपशिक्षिका मीना पाटील, उपशिक्षिक निलेश चव्हाण, ग्रामसेवक भरत घुले , ग्रामपंचायत सदस्य कैलास वळवी, पोलीस पाटील, दिलीप चौधरी तसेच प्रतिष्ठित नागरिक कृष्णाजी गंगाराम बोराणे हे उपस्थित होते.सीताराम पाटील यांचे जिल्हा परिषद शाळा उमर्द खुर्द व शाळा व्यवस्थापन समिती उमर्द खुर्देतर्फे आभार मानन्यात आले.
दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी एक लाखाचे पाणी फिल्टर व कुलिंग यंत्र दिल्याबद्दल सीताराम पाटील व शाळेच्या परिसरात असलेल्या रोपांना ठिबक सिंचन दिल्याबद्दल देविदास साळवे यांचा सत्कार केला.








