Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घरफोडी व मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीसह दोन विधी संघर्षित बालकांना अटक

team by team
July 22, 2022
in क्राईम
0
घरफोडी व मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीसह दोन विधी संघर्षित बालकांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरात घरफोडी व मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीसह दोन विधी संघर्षित बालकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दखील हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार शहरात २० जुलै रोजी दत्त कॉलनीत दत्त मंदिराचे दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीतील १७५० रुपये रोख व एक लहान तांब्याची कळशी चोरी गेली. तसेच शहरातील तळोदा रोडवरील तिरुपती प्लाझामधील दुकान नंबर जी ०९ मध्ये १८ व १९ जुलैच्या दरम्यान बियर पार्लर दुकानातील गल्ल्यातून २७ हजार रुपये व सहा हजारांचे मोबाईल चोरीस गेले.

यासंदर्भात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना चोरी करणारे आरोपी व विधी संघर्षित बालकांची माहिती मिळाली. त्यानुसार दत्त मंदीरात चोरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील सिंधी कॉलनी परिसरात ताब्यात घेतले.

संबंधित मुलाकडून दत्त मंदिराच्या गल्ल्यातील ७२० रुपये रोख व एक हजार ८०० रुपये किंमतीची एक तांब्याची कळशी हस्तगत करण्यात आली. तसेच शहरातील तिरुपती प्लाझामधील घरफोडीतील गिरीविहार गेट भिलाटी परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने बस स्थानक
परिसरातून संशयीत व विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले. संशयिताने तिरुपती प्लाझामधील एका बियर शॉपीत चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून ७ हजार ४०० रुपये रोख व एक मोबाईल असा एकूण १३ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

त्यांना उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार राकेश वसावे, पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू विजयी झाल्याने नंदूरबार येथे भाजपातर्फे जल्लोष

Next Post

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

Next Post
पदवीधर, शिक्षक मतदारसंघ मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add