Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेनेचे डॉ. विक्रांत मोरे २४ जुलै रोजी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता, हजारो कार्यकर्त्यांसह करणार शक्ती प्रदर्शन ?

team by team
July 21, 2022
in राजकीय
0
शिवसेनेचे डॉ. विक्रांत मोरे २४ जुलै रोजी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता,  हजारो कार्यकर्त्यांसह करणार शक्ती प्रदर्शन ?

नंदूरबार l प्रतिनिधी

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ . विक्रांत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपात जाण्याच्या प्रश्नाला पूर्ण विराम मिळाला असून शिवसेनेचे डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे हे दि.२४ जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.यावेळी त्यांच्या सोबत हजारो कार्यकर्तेही शक्ती प्रदर्शन करीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख डॉ . विक्रांत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे . याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या राजीनाम्यात त्यांनी जिल्ह्यात पक्षाचा प्रोटोकॉल पाळला जात नसल्याने व व्यक्ती केंद्रीत राजकारण होत असल्याने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे .

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ . विक्रांत मोरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे . याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या राजीनाम्यात म्हटले होते की , शिवसेनेत पक्षाचे काम निष्ठेने केले असून विश्वासाला तडा जावू दिला नाही . प्रथमच नंदुरबार पालिकेवर चार नगरसेवक निवडून आणले आहेत . पालिकेवर शिवसेनेचा प्रथम नगराध्यक्षा म्हणून शोभाताई मोरे विराजमान झाल्या .

एवढेच नव्हे तर विविध सामाजिक उपक्रम राबविले . तसेच आंदोलनेही केली . जिल्ह्यात नेत्यांचे दौरे यशस्वी केले . यामुळे शिवसेनेचा झंझावात पाहून इतर पक्षातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला . मात्र त्यांच्या या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत डॉ . मोरे यांनी राजीनाम्यातून व्यक्त केली आहे . तसेच नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण व्यक्ती केंद्रीत होत चालले असून पक्षाचा प्रोटोकॉल पाळला जात नाही .

तसेच व्यवसाय करुन राजकारण करत असल्याने सत्ता असली तरी जिल्हाप्रमुख पदावर राहण्याचा मोह नसल्याचे डॉ . मोरे यांनी राजीनाम्यात म्हटले आहे . डॉ . विक्रांत मोरे यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने चर्चेचा विषय ठरत होता . दरम्यान , ते भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करतात ? याकडे साऱ्यांचे लागून होते.

असतानाच त्यांनी माजी आ.शिरीष चौधरी यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपात जाण्याच्या प्रश्नाला पूर्ण विराम मिळाला असून शिवसेनेचे डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे हे दि.२४ जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

यावेळी शिवसेनेचे डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे हे मोठे शक्तीप्रदर्शन करीत त्यांच्या समवेत सुमारे १०० च्या वर कार्यकर्ते गाड्यांचा ताफ्यासह मुंबई येथे जाणार असल्याची चर्चा आहे.मुंबई येथे हजारो कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे पेट्रोल पंपाचे लायसन्स काढून देण्याचे आमीष दाखवून एकाची १० लाखात फसवणुक

Next Post

नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभागातील विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add