Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षकांची तीव्र नाराजी: अनुदान प्राप्त होऊनही सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्‍या व तिसर्‍या हप्त्यापासून जिल्ह्यातील शिक्षक वंचित

team by team
July 20, 2022
in शैक्षणिक
0
शिक्षकांची तीव्र नाराजी: अनुदान प्राप्त होऊनही सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्‍या व तिसर्‍या हप्त्यापासून जिल्ह्यातील शिक्षक वंचित

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे मोलगी या अतिदुर्गम शाखेचा शिक्षक संपर्क मेळावा जैन सामाजिक सभागृहात, मोलगी येथे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षकांसाठी राज्य शासनाच्यावतीने सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्‍या व तिसर्‍या हप्त्यासाठी अनुदान प्राप्त झाले असून माहे जूनच्या वेतनासोबत फरक देणेबाबत शासन निर्णय निर्गमित असताना जिल्ह्यातील शिक्षकांना या लाभापासून वंचित ठेवल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे मेळाव्यात दिसून आले.

मेळाव्यात दरवर्षी बदल्या पूर्वी पदोन्नती, निवडश्रेणी, पीएफएमएस प्रणालीबाबत प्रशिक्षण व्हावे, एमडीएम माहिती भरण्याससाठी रेंज कमी असल्याने अतिदुर्गम भागास विशेष मुदतवाढ मिळावी, एक शिक्षकी शाळांना द्विशिक्षक द्यावा, अन्यावश्यक टपाल माहिती, अनुदान उपलब्ध झाले तरी सातव्या वेतन आयोगाच्या फरकापासून शिक्षक वंचित, भविष्य निर्वाह निधी ऑनलाइन होवून स्लिप मिळावी आदी समस्या किसन पाडवी,

मगन गावित, राजू सामुद्रे, रायसिंग पाडवी आदी शिक्षकांनी प्रभावीपणे प्रश्न मांडले. प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी शिक्षकांना दिले.

प्रास्ताविकात मोलगी शाखा अध्यक्ष विलास तडवी यांनी मोलगी शाखेची निर्मिती शिक्षक परिषदेमार्फत केली जाणारी मदत आणि सामाजिक समरसता जपण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली तर संघटनमंत्री प्रकाश बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, उपाध्यक्ष राकेश आव्हाड, आबा बच्छाव, शरद घुगे, धनंजय सूर्यवंशी, जगदीश पाटील आदींनी मार्गदर्शन केले. अक्कलकुवा तालुकाध्यक्ष दिपक सोनवणे, नरहर कोकणी, बहादूरसिंग पाडवी, प्रवीण तडवी, मनोजकुमार चौधरी,

गोविंद सोनवणे, राजू सामुद्रे, धनराज सोनवणे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी संघटनेचे महत्व, संघशक्तीचे फायदे, शिक्षक परिषदेची शिस्त, कार्यपद्धती याविषयी माहिती देऊन दुर्गम भागातील संपर्क मेळाव्यात मांडल्या जाणार्‍या प्रश्नांना जिल्हास्तर, राज्यस्तरावरील प्रश्न प्रथम प्राधान्याने सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे याचा सत्कार करण्यात आला. मेळावा यशस्वीतेसाठी नामदेव तडवी, जात्र्या वसावे, रामा तडवी, हांजा वसावे, रामसिंग वसावे, किसन पाडवी, भिका वसावे, ईश्वर तडवी, मानसिंग वसावे आदींनी परिश्रम घेतले शाखा कोषाध्यक्ष दिलीप राऊत यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

४० वर्षानंतर पूर्ण झालेले देहली धरण पहिल्याच पावसात झाले ओवर फ्लो

Next Post

निपुण भारतअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात

Next Post
निपुण भारतअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात

निपुण भारतअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add