नंदुरबार| प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिका ( सी.आर.पी ) यांना मागील १८ महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्यामुळे मानधन मिळावे व याबाबात चर्चा घडवुन आणण्यासाठी शिष्टमंडळाला पाचारण करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय ट्रायबल पार्टीच्या जिल्हाध्यक्षांसह २१६ गटप्रेरिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर तशाच बसुन होत्या.मात्र याबाबत कुठलाही निर्णय होवु शकला नाही. १८ महिन्यांचे थकीत मानधन बाकी असतांना अजुन किती चकरा मारायचा असा सवाल गटप्रेरिकांमधुन करण्यात येत आहे.याबाबतचे निवेदन भारतीय ट्रायबल पार्टीच्या जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा परिषद नदुरबार अंतर्गत इत्तर तालुक्यातील उमेदच्या गट प्रेरिकांंना मानधन मिळालेले आहे . परंतु नवापुर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिका ( सी.आर.पी ) यांना मागील १८ महिन्याचे थकीत मानधन जि.प.च्या गचाळ कारभारामुळे न मिळाल्यामुळे गटप्रेरिकांंना कोरोना काळाल उपासमार होत असून काही गटप्रेरिकां विधवा व काही परितक्त्या महिला असून काही गटप्रेरिकांचे चार वर्षापासूनचे मानधन व काहींचे कामावर लागल्यापासून मानधन जि.प.च्या गलथान कारभारामुळे मिळालेले नाही . गटप्रेरिकांचे मानधन मिळण्यासाठी जि.प. विभागाला अनेकवेळा अर्जफाटे करून अधिकार्यांशी चर्चा घडवून आणलेली आहे व लेखी आश्वासने देवूनही सी.आर.पी. नां मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे . जिल्ह्यात १४४ कलम लागु असल्यामुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मानधन मिळण्यासाठी सनदशिर मार्गाने धरणे आदोलन , आमरण उपोषणा करू शकत नसल्यामुळे आपण आपल्या स्तरावर जि, प . चे अधिकारी व पक्षांच्या शिष्टमंडळाशी चर्चा घडवून आणण्यासाठी वेळ द्यावी.अशी मागणीचे निवेदन भारतीय ट्रायबल पार्टीच्या जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. नवापुर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिका ( सी.आर.पी ) यांना मागील १८ महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्यामुळे मानधन मिळावे व याबाबात चर्चा घडवुन आनण्यासाठी शिष्टमंडळाला पाचारण करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय ट्रायबल पार्टीच्या जिल्हाध्यक्षांसह २१६ गटप्रेरिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर तशाच बसुन होत्या.याकडे लक्ष द्यायला अधिकारी ना नेत्यांना वेळ मिळाला.