Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून

team by team
July 18, 2022
in राज्य
0
संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून

मुंबई l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस् (GCC-SSD CTC) या दोनही परीक्षा दि. २५ जुलै ते दि. २३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एकूण २८१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे दि. १६ जुलैपासून देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत देण्यात आली आहे.

संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परीक्षार्थींची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षार्थींना वितरित करण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्रासोबत परीक्षा परिषदेने पुरविलेल्या नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आणणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्याचे स्वतःचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, फोटो बदल, सही बदल तसेच विषय बदल (हे फक्त त्या त्या विषयाचेच देण्यात येतील. उदा. इंग्रजी ३० असेल तर इंग्रजी ४०, मराठी ३० असेल तर मराठी ४०, हिंदी ३० असेल तर हिंदी ४०) इ. बाबत दुरूस्ती असल्यास प्रत्येक चुकीस दोनशे रूपये शुल्क आकारण्यात येईल.

संस्थाचालकांनी प्रवेशपत्र निर्गमित झाल्यापासून परीक्षेपूर्वी (विद्यार्थ्याचा फोटो व ओळखपत्रासह) समक्ष कार्यालयीन वेळेत येऊन प्रवेशपत्रावर सक्षम प्राधिकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांची सही व शिक्का घ्यावा, तरच संबंधित विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होता येईल.

तसेच सर्व परीक्षार्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावीत. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरूस्ती करून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज सादर करावे

Next Post

मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू; सर्व मृतदेहांची ओळख पटली, अमळनेर येथील चार तर धुळे येथील दोघांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add