नंदुरबार | प्रतिनिधी
अमृत महोत्सवी वर्षी जनशिक्षण संस्थान नंदुरबार १ तर्फे एक राखी सैनिकांसाठी उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनशिक्षण संस्थान १ चे चेअरमन केदारनाथ कवडीवाले तर प्रमुख पाहुणे म्हणुन निवृत्त मेजर राजेश गिरनार तसेच सदस्य सरदार पावरा, कल्पना पाटील उपस्थित होते. संचालक बाबुलाल माळी यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी मांडली. संपूर्ण महाराष्ट्रातून २१ जन शिक्षण संस्थान कडुन ७५ हजार राख्या सिमा सुरक्षा जवानांना पाठविण्याचा संकल्प केला होता. नंदुरबार १ तर्फे २५०० राख्या सैनिकांसाठी साधन व्यक्ती व प्रशिक्षणार्थीकडून तयार करण्यात आल्या.
या सर्व राख्या सिमेवरील जवानांना चेअरमन व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मेंबर यांच्या हस्ते पाठविण्यात आल्या. याप्रसंगी निवृत्त मेजर राजेश गिरनार यांनी आपल्या सेवा काळात सिमा सुरक्षा रक्षकाला कश्या प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. त्यांचा अनुभवातून सांगितला. नशिक्षण संस्थानचे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला व आपल्या कल्पकतेने विविधरंगी व तिरंगी रंगात राख्यांची निर्मिती केली. या सर्व राख्या पोस्टाने कुपवाडा जन शिक्षण संस्थेकडे रवाना करण्यात आल्या. प्रातनिधिक स्वरुपात उपस्थित मुलींनी मेजर राजेश गिरनार यांच्या हातावर राखी बांधली व सैनिकांप्रती आपला आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखाधिकारी शरद जोशी यांनी केले. आभार कल्पेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झज, Aझज, साधन व्यक्ती व कर्मचारींनी परिश्रम घेतले.