शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागातील विद्यार्थी वसावे किरसिंग धर्मा रा.गमन – नर्मदाकाठ ता.अक्कलकुवा जि. नंदुरबार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून जलसंपदा विभागाच्या अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सन 2018 यावर्षी बी.ई. सिव्हिल विषयात किरसिंग वसावे याने डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.त्याने सन 2019 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची परीक्षा दिली होती.त्यात त्याची मृद व जलसंधारण विभागात अभियंतापदी निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील,मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील,संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील,विविध विद्याशाखांचे प्राचार्य,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जे.पाटील, अकॅडमीक डीन डॉ. डी.एम.पटेल, स्थापत्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा.संजय दहिवेलकर , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.आर. एस. पाटील, कुलसचिव दिनेश एन. पाटील,सर्व प्राध्यापक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.