नंदुरबार l प्रतिनिधी
ट्रायबल स्पोर्ट्स ऍण्ड एज्युकेशन सोसायटी नंदुरबारतर्फे सातपुडा गौरव पुरस्काराचे वितरण येथील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात करण्यात आले आहे.
या पुरस्कार वितरण प्रसंगी क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दिल्ली संचालक डॉ.विक्रम सिंग, फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.बलवंत सिंग, हस्ती समुहाचे चेअरमन कैलास जैन, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, न.पा.पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, ट्रायबल स्पोर्ट्स ऍण्ड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.मयुर ठाकरे, उपाध्यक्ष जितेंद्र माळी, सचिव जगदिश वंजारी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पुरस्कार्थींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी बोलतांना डॉ.विक्रम सिंग म्हणाले की, आदिवासी भागात खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात क्षमता असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. देशपातळीवर ग्रामीण दुर्गम भागातील खेळाडूच चमकतात हे दिसून येते. तसेच डॉ.बळवंत सिंग यांनी नंदुरबार जिल्ह्यातील खो-खो, कबड्डी, ऍथलेटिक्स खेळाडूंच्या अंगी उपजत गुण असल्याचे सांगितले.
सातपुडा गौरव राष्ट्रीय पुरस्कारार्थींनामध्ये प्रा.डॉ.अनिल पाटील (रावेर), माधव गावंडे (मुंबई), अर्चना उके (बांद्रा), डॉ.वंदना शर्मा (ठाणे), अनिता पाटील (ठाणे), यज्ञेश्वर भागराव (ठाणे), रितेश दुबे (वाराणसी), सुधीर कुमार (दिल्ली), डॉ.निस्सार हुसेन (मुंबई), असिफ खान (परभणी), शैलेंद्र रघुवंशी, अनिल रौंदळे, दिनेश बैसाणे (नंदुरबार), प्रा.भुपेंद्र मालपुरे (धुळे), डॉ.नितीन देऊळकर (अकोला), डॉ.संतोष तायडे (अकोला), डॉ.कल्याण मालधुरे (येवडा), डॉ.प्रविण पाटील (नागपूर), डॉ.उमेश राठी (अमरावती), डॉ.प्रविण लामखेडे (नागपूर), डॉ.अनिल वैद्य (अमरावती), प्रा.डॉ.अविनाश खरात (बुलढाणा), डॉ.बबलू श्रीगीरीवार (नागपूर), डॉ.सागर नारखेडे (अकोला), डॉ.संघपाळ नन्नावरे (पांभुर्णी), प्रा.डॉ.प्रकाश लोहार (चोपडा), डॉ.दिनेश पाटील (शेंदुर्णी), जयकुमार ठक्कर सुरत).
सातपुडा गौरव जिल्हा पुरस्कारार्थींमध्ये प्रा.डॉ.मधुकर देसले, प्रा.युवराज राठोड, जितेंद्र पगारे, प्रविण परदेशी, विशाल पाटील, रामकृष्ण बागल, विनोद पाटील, धनराज पाटील, प्रा.तुषार पाटील, हेमंत खैरनार, भिकु त्रिवेदी, धनराज मराठे, बन्सीलाल पाटील, प्रा.दिनेश सुर्यवंशी आदींना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल चव्हाण, अमोल चित्ते, मनिष सनेर, प्रदीप माळी, चेतन शेवाळे, निलेश गावीत, प्रा.एन.एस.पाटील, राकेश चौधरी, भरत चौधरी आदींनी परिश्रम घेतले.