शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी हिमांशु राजेंद्र पाटील आणि हिमांशु धर्मेंद्र पटेल यांची मास्टर ऑफ ॲग्रोबिजनेस या दोन वर्षांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात निवड झाली आहे.
के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतलेल्या हिमांशु राजेंद्र पाटील व हिमांशु धर्मेंद्र पटेल या दोन्ही विद्यार्थ्यांची युनिवर्सिटी ऑफ क्विन्सलॅण्ड ब्रिसबेन,(ऑस्ट्रेलिया) या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी निवड झात्याची माहीती विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.भरत चौधरी यांनी दिली आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांनी अभिनंदन व सत्कार केला असून ते दोघेही दि.9 जुलै रोजी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत.या महाविद्यालयात शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम तसेच उपक्रम राबविले जातात.
त्यात ॲडवान्स ट्रेनिंग स्किल्ड कार्यक्रम, कृषकोत्सव, कृषि तिर्थ, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, पुस्तक वाचन व सादरीकरण,शिवार फेरी, मान्यवरांसह कृषितज्ज्ञांची व्याख्याने, कृषी शिक्षण दिन, कृषी औद्योगीक प्रकल्पांना भेटी, कार्यानुभव उपक्रम,
शेतकरी मार्गदर्शन व मेळावे इ. उपक्रमाचा समावेश आहे.या दोन्ही विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी परदेशात निवड झाल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.