Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे भगवान श्री जगन्नाथ यांची काढण्यात आली भव्य शोभा रथयात्रा

team by team
July 2, 2022
in सामाजिक
0
शहादा येथे भगवान श्री जगन्नाथ यांची काढण्यात आली भव्य शोभा रथयात्रा

शहादा l प्रतिनिधी
येथिल श्री.नारायण भक्तीपंथ नारायमपूरम तीर्थच्या वतीने भगवान श्री जगन्नाथ यांची भव्य शोभा रथयात्रा काढण्यात आली.या रथयात्रेत विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध लेझीम नृत्य कलशधारी महिलांचे गरबा नृत्य आणि वारकऱ्यांच्या वेशात भजनावर टाळ मृदुंगाने ठेकाधरीतज्येष्ठ व्यक्तींचे नृत्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. अतिशय उस्ताहात काढण्यात आलेल्या भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेमुळे शहरात भक्तिमय वातावरण पसरले होते.

शहादा येथील श्री. नारायण भक्ती पंथ नारायणपुरम तीर्थच्या वतीने शहादा शहरातून भगवान श्री जगन्नाथांची भव्यरथ यात्रा काढण्यात आली येथील प्रेस मारुती मैदानापासून अतिशय भक्तिमय वातावरणात निघालेली हि रथयात्रा दोंडाईचा रोड , बसस्थानक मार्गे डोंगरगाव ते दादावाडी जवळ विसर्जित करण्यात आली.

जगन्नाथपुरी येथे भगवान जगन्नाथांची भव्यरथ यात्रा काढण्यात येते त्याच धर्तीवर शहाद्यातही रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेवर जागोजागी पुष्पवृष्टी केली जात होती रथयात्रेदरम्यान धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक व शारजाई दामोदर पुढे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढोल पथकावर सुंदर व तितकेच शिस्तबद्ध लेझीम नृत्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

जागोजागी महिलांचे गरबा नृत्य आणि मालपुर येथील भजनी मंडळाचे वारकरी वेशात टाळ मृदुंग हातात घेऊन भगवंताच्या भजनांवर तल्लीन होऊन ठेका धरीत होते भगवान जगन्नाथांचा रथ ओढण्यासाठी भाविक भक्तिमय झाले होते.

शहरातील विविध मार्गांवरून निघालेली ही रथयात्रा शिस्तबद्ध होती या रथयात्रेमुळे वातावरण भक्तीमय झाले होते रथयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.नारायणपुरम भक्ती पंथाचे जगदीश पाटील, शांतीलाल पाटील, योगीराज जाधव, नरेंद्र पाटील, विशाल गारोळे, अशोक पाटील आदी भाविकांनी परिश्रम घेतले. रथयात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

रांझणी कृषि विद्यालयात कृषि दिन साजरा 

Next Post

मोठी कामगिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 43 लाखाची बनावट दारु केली जप्त

Next Post
मोठी कामगिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 43 लाखाची बनावट दारु केली जप्त

मोठी कामगिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 43 लाखाची बनावट दारु केली जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add