नंदुरबार l प्रतिनिधी
राजस्थानच्या उदयपूरमध्ये एक सर्वसामान्य टेलरकाम करणाऱ्या कन्हैयालालच्या आठ वर्षाच्या मुलाने चुकून नुपूर शर्माचे समर्थन करणारी पोस्ट टाकली म्हणून रियाज आणि गोस मोहम्मद या धर्मांध जिहाद्यांनी कन्हैयालाल यांचा गळा चिरून तालिबानी पध्दतीने निर्घृण खून केला आणि खून केल्यानंतर व्हिडीओ करत कुकृत्याची जबाबदारी सुद्धा स्वीकारली आणि उघड धमकीसुध्दा दिली आहे.
कन्हैयालाल या हिंदू व्यक्तीचा तालिबानी पध्दतीने अमानुष खून करणाऱ्या जिहादींना कायद्याचा धाक प्रस्थापित होणेसाठी लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठविले. निवेदन अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांना दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मंगळवारी भरदिवसा कन्हैयालाल यांचा टेलरिंग दुकानात घुसून हल्ला करून धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. रियाजने घटनेचा आधी १७ जून रोजी हत्येचा कटाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ‘ही धर्माची लढाई आहे’ असे त्याने सांगितले आणि हत्येनंतर हा व्हिडीओ पोस्ट केला. या तालिबानी वृत्तीचा जिहाद्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही मारण्याची धमकी दिल्याचे व्हिडीओ प्रसारित झाला आहे.
या घटनेवरून एकच सिद्ध होते की, भारतामध्ये ही तालिबानी वृत्तीचे जिहादी वावरत आहेत त्यांना वेळीच ठेचणे आवश्यक आहे अन्यथा या देशात भविष्यात अश्या जिहादींकडून मोठा रक्तपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी या धर्मांध जिहाद्यांवर कठोर कारवाई करावी आणि यांचा मागे कोणते अदृश्य हात आहे त्याचा शोध घेऊन या घटनेचा मुळाशी जाऊन त्यांना कायद्याने कठोर शिक्षा करावी.
कायद्याचा धाक प्रस्थापित होणेसाठी या धर्मांधांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर धर्मसेवक नरेंद्र पाटील, पंकज डाबी, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, राजू चौधरी, मयूर चौधरी यांची स्वाक्षरी आहे.