नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्याच्या दोन तपानंतरही विभागातील आठ शासकीय कार्यालयांचा कार्यभार धुळ्याहून होत असल्याने तातडीने नंदुरबार जिल्ह्यात उर्वरित शासकीय कार्यालय कार्यान्वित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने उपाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत यांनी केली आहे.
या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्रींना निवेदनाद्वारे पाठवलेल्या प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की नंदुरबार जिल्हा निर्मिती होऊन दोन तप अर्थात 24 वर्षे पूर्ण झाले मात्र अद्यापही जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालयांचा कार्यभार धुळे येथूनच सुरू आहे.
सोशल मीडियाद्वारे कार्यभार सांभाळणाऱ्या काही कार्यालयामुळे शासकीय रिक्त पदे आणि यंत्रणा खिळखिळे झाले आहेत. तब्बल 24 वर्षे उलटल्यानंतरही अजूनही जिल्हास्तरीय कार्यालयांची भ्रमणध्वनी पुस्तिका अध्याप उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असून सातत्याने नागरिकांना कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत आहे.
वजन माप निरीक्षक, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, कामगार न्यायालय, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, रिमांड होम व शिशू गृह, परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय तसेच विभागीय टपाल कार्यालय देखील अद्याप धुळे जिल्ह्यात असल्याने नंदुरबार जिल्ह्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची लढाई अजूनही सुरूच आहे.
अनेक शासकीय कार्यालयातील बैठका व राष्ट्रीय उपक्रमांना संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे .आपत्ती निवारण व इतर वेळी दुर्गम भागात जिल्हाधिकारी पायपीट करून पोहोचतात मात्र संबंधित यंत्रणा पोहोचत नाही याची खंत वाटते.
नागरिकांच्या रोशाला बळी पडावे लागते म्हणून राज्य प्रशासनाने तातडीने धुळे जिल्ह्यातील उर्वरित कार्यालय नंदुरबार येथे कार्यानु त करण्याची मागणीमहाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केली आहे.