नंदुरबार l प्रतिनिधी
आधुनिक संख्याशास्त्राचे जनक आणि कोलकाता येथील संख्याशास्र संस्थेचे संस्थापक डॉ.प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा नियोजन कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास ) विजय शिंदे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एल.के.कोकणी,वैभव देशमुख, संशोधन अधिकारी आर. एन. वसावे तसेच जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या संख्याशास्त्रातील सामाजिक व आर्थिक नियोजन तसेच निती निर्धारणाची माहिती युवा पिढीला व्हावी यासाठी केंद्र शासनाने त्यांचा जन्मदिवस 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सांख्यिकी सहायक गोरखनाथ लहरे यांनी यावेळी दिली.
यावेळी सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकल्पना शाश्वत विकास ध्येय-2 या चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते. चर्चासत्रात अर्थ व सांख्यिकी संचालनातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.