नंदूरबार l प्रतिनिधी
पंजाब चंदिगड येथे झालेल्या नाईन ए साईड राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलच्या मयूर पवार या खेळाडूने कांस्यपदक पटकावले.
मुंबईच्या संघात दिल्ली दिल्ली संघाला 16 धावांनी पराभूत करत कांस्य पदक पटकावले.पंजाब क्रिकेट असोसिएशन व भारतीय नाईन ए साईड क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने चंदीगड येथे दिनांक 24 ते 28 जून 2022 दरम्यान राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबार येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी मयूर पवार यांची निवड 19 वर्षातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड करण्यात आली होती.
सदर स्पर्धेत मयूर पवार याने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संपूर्ण मालिकेत 9 विकेट व 78 रन केले. त्याच्या या ऑलराऊंड खेळामुळे मुंबई संघाला कांस्यपदक मिळाले.
त्याच्या या कामगिरीबद्द्ल सार्वजनिक शिक्षण समिती चेअरमन ॲड. रमणभाई शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक जगदीश पाटील, क्रीडा प्रमुख भिकू त्रिवेदी यांनी अभिनंदन केले तर या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले.








