नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील तहसिलदार कार्यालयात तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्ष देवमन पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीत २९८ पैकी १५८ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
यावेळी तहसिलदार भाउसाहेब थोरात,सदस्य इकबाल खाटीक,रंजनाबाई नाईक,नायब तहसिलदार नितीन पाटील,अव्वल कारकून प्रिती पाटील,महसुल सहायक मंगला वसावे,चेतन सोनार अदि उपस्थित होते.
यांत संजय गांधी निराधार योजनाचे १२३ पैकी ७१ प्रकरणे मंजूर करण्यात आले.तर १३ प्रकरणे नामंजूर तर ३९ प्रकरणांची कागदपत्राची पुर्तता करण्यास सांगितले आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनाचे ६८ पैकी ४५ प्रकरणे मंजूर करण्यात आले.तर ६ प्रकरणे नामंजूर तर १७ प्रकरणांची कागदपत्राची पुर्तता, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनाचे ६५ पैकी २८ प्रकरणे मंजूर करण्यात आले.
तर ८ प्रकरणे नामंजूर तर २९ प्रकरणांची कागदपत्राची पुर्तता,तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनाचे ४२ पैकी १४ प्रकरणे मंजूर करण्यात आले.
तर १४ प्रकरणे नामंजूर तर १४ प्रकरणांची कागदपत्राची पुर्तता करण्यास सांगितले आहे.तालुक्यातील प्रात्र लाभार्थ्यानी परिपूर्ण प्रकरण दाखल करावे जेणेकरून सर्वाचे प्रकरणे मंजूर करता येतील असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.








