Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खबरदार : जिल्हा रुग्णालयात जातांना ही चूक केल्यास मिळेल ५०० रुपये दंड

team by team
June 28, 2022
in आरोग्य
0
खबरदार : जिल्हा रुग्णालयात जातांना ही चूक केल्यास मिळेल ५०० रुपये दंड

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तंबाखू, विमल गुटखा खाऊन रुग्णालयात थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दिवसभरात तीनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत असतात. याव्यतिरिक्त कुपोषित बालके, सिकलसेल रूग्ण, प्रसूती माता, तसेच विविध आजारां सह गंभीर अपघाताच्या रुग्णांना उपचार होईपर्यंत रूग्णालयात थांबावे लागते.

यादरम्यान दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक ही मोठ्या प्रमाणात रुग्णालयात येत असतात. रुग्णालयात येणारे रुग्ण व नातेवाईक यापैकी काही जण तंबाखू विमल गुटखा खाऊन रुग्णालयाच्या आवारात तसेच खिडक्या-दरवाजे व खाटेखाली थुंकून घाण करत असल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णालय प्रशासनाने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.

रुग्णालयाच्या आवारात तंबाखू, विमल गुटखा खाऊन थुंकल्याच्या दुर्गंधीमुळे रुग्णां सोबत रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांनाही याचा मोठा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासना कडून तंबाखू, विमल गुटखा सेवन करून रुग्णालयात आल्यास व रुग्णालयाच्या आत जाताना सोबत घेऊन गेल्यास पाचशे रुपये दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील सुरक्षारक्षकांनी रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची कसून तपासणी करत कारवाईला सुरूवात केली आहे. रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात तंबाखू विमल गुटखा खाऊन थुंकू नये दुर्गंधी पसरवू नये असे आवाहान रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील 5 इसम 2 वर्षांसाठी जिल्ह्यातुन हद्दपार

Next Post

राज्यात ७ हजार २३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार : गृहविभागाची अधिसूचना जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add