नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याच्या निषेधार्थ शहरातील प्रवेशव्दारा जवळुन निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील,,तालुकाप्रमुख बकाराम गावीत,शहर प्रमुख अनिल वारुडे,तालुका संघटक देवका पाडवी,युवासेना जिल्हा उपअधिकारी दिनेश भोई,किशन सिरसाठ,उपशहर प्रमुख सचिन चौधरी,उपशहर प्रमुख फिरोज शेख,उपशहर प्रमुख हितेश पाटील,मनोज वाडीले,मयुर पाटील,उपतालुका प्रमुख कलपीत नाईक,रमेश गावीत,युवराज पाडवी,बिलाल सैय्यद,मनोहर चौधरी,प्रमोद वाघ,दिनेश खैरनार,महेंद्र गावीत सह नवापूर व विसरवाडी गावाचे शिवसेनेचे पदधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी निषेध मोर्चा नवापूर प्रवेश व्दार जवळ काढुन,साईमंदीर,बसस्थानक, मेनरोड,लाईट बाजार या मार्गाने काढुन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन निषेध मोर्चाचे सांगता करण्यात आली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे,पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरीक्षक अशोक मोकळ,मनोज पाटील,प्रविन कोळी, पो हे का निजाम पाडवी,पवन राजपूत,विकास पाटील,योगेश थोरात,कैलास तावडे,नरेंद्र नाईक,जगदीश सोनवणे,प्रेम जाधव,प्रविन मोरे,प्रमोद राठोड,दादाभाई वाघ,अलताफ शेख,गणेश बच्छे,आदीनी चोख बंदोबस्त ठेवला होता.