नंदुरबार | प्रतिनिधी
एस. ए. मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे नवनीत वाला यांच्यातर्फे मोफत शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या प्राचार्य नुतनवर्षा वळवी होत्या, तर प्रमुख पाहुणे नवनीत वाला हे होते, यावेळी शाळेतील १२०० विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेट्या,आणि पेन इ.सहित्यांचे वाटप करण्यात आले,यावेळी आपले मनोगत मांडताना श्री. वाला म्हणाले की,विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यात प्रगती करावी असे सांगीतले.
प्राचार्य नुतनवर्षा वळवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,भविष्यात तुम्ही ही चांगलं शिक्षण घेऊन, मोठ्या पदांवर पोहचून भविष्यात अशाच प्रकारे गोरगरिबांना मदत करून त्यांचे दातृत्व करावं असे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा,पर्यवेक्षक मिनल वळवी,ज्येष्ठ शिक्षक अरुण गर्गे,सतिश सदाराव आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसाद दीक्षित यांनी मानले.