नंदुरबार l प्रतिनिधी
येथील बाल रोगतज्ज्ञ डॉ.सुजित पाटील यांनी दिग्दर्शन केलेल्या “बटरफ्लाय ‘या लघू हिंदी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय शोर्ट फिल्म महोत्सवात उत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा ॲवार्ड पश्चिम बंगालच्या फेस्टीवलमध्ये जाहीर झाला असून विन्टेज रील्स फिल्म फेस्टीवलमध्येही तीन ॲवार्ड एकटया “बटरफ्लाय’ला घोषीत झाल्याची माहिती निर्माते डॉ. राजकुमार पाटील यांनी दिली.

नंदूरबार शहरातील डॉक्टर व कलाकारांचा सहभाग असलेला बटरफ्लाय हा लघुचित्रपट नंदुरबार शहरात २९ मे रोजी दाखविण्यात आला होता. त्यावेळेस या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
आता या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात बेस्ट शॉर्ट फिल्म चा अवार्ड मिळवून आम्हाला सुखद धक्का दिला आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम अशी भुमिका वठवली असल्याचे मत डॉ.राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच या लघूचित्रपटाला बेस्ट युथ डायरेक्टर ,बेस्ट डायलॉग, बेस्ट मेन्शन ॲवार्ड असे तीन वेगळे ॲवार्ड वीन्टेज रील्स फिल्म् फेस्टीवलमध्ये जाहीर करण्यात आले आहेत.
रणजितसिंग राजपूत, डॉ.राजकुमार पाटील, डॉ. वृषाली पाटील,पुनम भावसार, डॉ.राजेश कोळी,डॉ. प्रकाश ठाकरे, दिलीप सोनार, दिलीप सोनार, प्रशंसा तवर, कामिनी भोपे,डॉ जयंत शाह,संदीप सुर्यवंशी, अनिता वसावे,नंदा सोनार,रविंद्र पोतदार,डॉ.स्वप्नील जैन,नागसेन पेंढारकर,डॉ.अनिकेत नागोटे आदींच्या महत्वपूर्ण भुमिका आहेत.
डॉ.सुजित पाटील यांनी आता पर्यंत पाच शॉर्ट फिल्म बनवल्या असून जवळपास सर्वच लघू चित्रपटांना ॲवार्ड मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव भरवून त्यांनी नंदुरबारच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.
आता तर त्यांचे लघूचित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय लघूचित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून देखील काम केले आहे. नंदुरबारच्या लघूचित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲवार्ड घोषीत झाल्याने आमच्या टीमला खुप आनंद झाला आहे. ही केवळ आमच्यासाठीच नव्हे तर खानदेशासाठी अभिमानाची गोष्ट आहे,असे डॉ राजकुमार पाटील यांनी सांगितले.
कथा डॉ सुजित पाटील यांचीच असून मानसिंग राजपूत, सारजन शेट्टी, मयूर सुर्यवंशी यांनी कॅमेरामन म्हणून उत्तम न्याय दिला.








