नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील गेंदाचा होळीपाडा येथे दोघांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील गेंदाचा होळीपाडा येथील शिवाजी नरसिंग पावरा यांनी दिलीप नरसिंग पावरा याच्या शेतातील ज्वारीचे खुट्टे काढण्याचे मजूरीचे काम घेतले होते ते पूर्ण केले नाही.
या कारणावरुन दिलीप नरसिंग पावरा व वाहरीबाई दिलीप पावरा यांनी शिवाजी नरसिंग पावरा व नरसिंग रंगल्या पावरा यांना काठीने मारहाण करुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत शिवाजी पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कालुसिंग पाडवी करीत आहेत.








