नंदूरबार l प्रतिनिधी
सोनखांब ता.नवापूर गावाच्या पुढे टँकर- ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली असुन या अपघातात १ जण जबर जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसापासून धुळे -सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
काल संध्याकाळी जोरदार पाऊस सुरु असताना धुळे सुरत महामार्गावरील सोनखांब गावाच्या पुढे वळणा वर भरघाव वेगात येणाऱ्या ट्रक आणी टँकरची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातामुळे टँकर चालक केबिनमध्ये अडकून पडला होता.
त्याचा पाय तुटल्याने तो जबर जखमी झाला. या अवस्थेत 108 चालक मानसिंग गावीत यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्यने जखमी चालकाला बाहेर काढुन तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
परंतु जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. नवापूर तालुक्यात पाऊस सुरू झाला असून महामार्गावर खडी, रेती,चिखल पसरला आहे. त्यामुळे भरधाव येणारे वाहन स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाण सुरू झाले आहे. वाहन चालकांनी पावसाळ्यात आपले वाहन हळुवार चालवणे आवश्यक आहे.








