नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील ईस्लामपुरात भांडणाच्या कारणातून एकास चाकूने वार केल्याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील ईस्लामपूरा येथे भांडणाच्या कारणावरुन सिताराम जामसिंग पावरा यांना ढेबा उर्फ हिंमतसिंग फकीरा पावरा याने पकडून सोना हिंमतसिंग पावरा याने दुधारी चाकू काढून सिताराम पावरा यांना मारण्याचा प्रयत्न केला असता
जामसिंग पावरा यांनी हाताने चाकू पकडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. तसेच अशोक उर्फ अकील हिंमतसिंग पावरा, किसन हिंमतसिंग पावरा यांनीही शिवीगाळ करीत मारहाण केली.
याबाबत सिताराम पावरा यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण करीत आहेत.