नंदूरबार l जीवन माळी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा पो.पिंपळोद ता. नंदुरबार या शाळेत जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील, दिपक वळवी, रामानंद बागले,शहरुणखाॅ शिकलीगर, संजय बोरसे, श्रीमती संगीता गोखले, श्रीमती अरूंधती शिंदे, श्रीमती नेहा शर्मा, संजय वसावे व दिनेश पवार आदी शिक्षक- शिक्षकेत्तर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना योगासने प्राणायाम ध्यानधारणा व शांतीपाठ चे प्रात्यक्षिक शाळेचे योगशिक्षक आनंदराव पवार व विजय पवार यांनी दिले.कार्यक्रमाची सांगता योग प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.