नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.13 ऑगस्ट 2021 रोजी असली ता.धडगाव येथे राखीव. शनिवार 14 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 वाजता असली ता.धडगाव येथुन नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. त्यानंतर नंदुरबार येथील निवासस्थानी मुक्काम.
रविवार दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजता नंदुरबार येथुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता नंदुरबार येथून सोमावल ता.तळोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकुवा येथील व्यापारी गाळ्यांचे उद्घाटन. सायंकाळी 7.30 वाजता अक्कलकुवा येथून नंदुरबारकडे प्रयाण व मुक्काम.
सोमवार 16 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता नंदुरबार येथुन बोराडी ता.शिरपूरकडे प्रयाण.