नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत.दोन दिवसात जिल्ह्यात तब्बल ४ रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नंदूरबार जिल्हयात तब्बल तीन महिन्यांनी काल दि.२० जून रोजी कोरोनाचा रुग्ण आढळला होता.आज २१ जून रोजी पुन्हा तळोदा येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळला दरम्यान आज सायंकाळी प्रशासनाचा अहवाल प्राप्त झाला यात अजून दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.यार
नंदूरबार शहरातील खोडाई माता मंदिर रस्त्यावरील 65 वर्षीय महिलेस व तालुक्यातील हाटमोहिदा ता.नंदुरबार येथील 75 वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात सध्याच्या घडीला चार कोरोना रुग्ण आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.