नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा- दोंडाईचा रस्त्यावर बोराडीकडून शहादा कडे येणाऱ्या मोटरसायकलने कंटेनर वाहनास ओव्हरटेक करीत असताना दोन मोटारसायकलची सामोरा समोर धडक झाली.दरम्यान आजोबा व नातू यांना कंटेनरने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली .
या अपघातात मोटार सायकलस्वार गंभीर जखमी आहे.ही घटना अनरदबारी उमीया भोजनालय लगत- महावीर कोल्डस्टोरेजच्या समोर आज दि.१७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडलेली आहे . घटनेचे वृत्त कळताच पोलिस त्या ठिकाणी पोहचून कंटेनर चालक व क्लीनर या दोघांना अटक केली. मयत दोघे खेतिया येथील रहिवासी आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे . की मयत स्वप्नील जगदीश बडगुजर (वय१९) व आजोबा लक्ष्मण माधव बडगुजर(वय.८५) हे दोघं नातू आजोबा ॲक्टिवा वाहन ( क्र.एम.पी.46, एम. डब्ल्यू.0178) या दुचाकी वाहनाने बोराडी कडून शहादा कडे येत होते. दरम्यान अनरदबारी लगत वळणाच्यापुढे लगतच्या जळून जात असलेली कंटेनर ( एम. एच.40, वाय.9113) या आवाहनास ओव्हरटेक करीत असतानाच शहाद्याकडून फेस गावाकडे हिरो होंडा दुचाकी मोटरसायकलीवर (क्र. एम. एच, 19_ए 6849) राहुल कैलास पाटील रा फेस हा भरधाव वेगाने जात असताना समोरील ॲक्टिवा वाहनास जोरदार धडक दिली.
ॲक्टिवा वाहन चालकाचा वाहनावरील बॅलन्स गेल्याने नातू व आजोबा दोघं खाली पडले. त्याच दरम्यान कंटेनर वाहनाच्या मागील चाकात आल्याने त्यांच्या अंगावरून गेल्याने स्वप्नील जगदीश बडगुजर व आजोबा लक्ष्मण माधव बडगुजर यांचा जागेवरच मृत्यू झाला.
ही घटना उमिया भोजनालय लगत महावीर कोल्डस्टोरेज जवळ घडली . हिरो होंडा चालक याने जोरदार धडक दिल्यामुळे त्याचे वाहन देखील बाजूला तीन ते चार वेळा पलटी मारल्याने तो रस्त्याच्या बाजूला फेकला गेला त्यात तो जखमी झाला.
जखमी राहुल कैलास पाटील याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आलेले आहे. अपघाताचे वृत्त कळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी शहादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील पोलीस नाईक वंदन गिरासे, राजू वळवी यांनी तातडीने घटनास्थळी पोहचले .याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक व क्लीनर या दोघांना अटक केली.








