मेष:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. मनासारखा व्यवसाय होईल. प्रवास कार्यसाधक होतील.
वृषभ:- दूरचे प्रवास होतील. गुंतवणूक परतावा देईल. उच्च शिक्षण घेण्यास योग्य कालावधी आहे.
मिथुन:- आरोग्याची चिंता सतावेल. मात्र काही आनंदाचे प्रसंग येतील. बढती मिळेल.
कर्क:-लाभदायक दिवस आहे. जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. प्रेमात यश मिळेल. कोर्ट कामात यश मिळेल.
सिंह:- कामात यश मिळेल. कर्जे मंजूर होतील. अनुकल दिवस आहे. संधीचे सोने करा.
कन्या:- काही चांगले निर्णय आज होतील. गूढ उकलेल. प्रेमात यश मिळेल. कला बहरतील.
तुळ:- शासकीय सन्मान मिळतील. उपासना केल्यास उत्तम लाभ मिळतील. कामे मार्गी लागतील.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल. व्यवसाय वृद्धी होईल.
धनु:- स्वतःसाठी खर्च कराल. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आनंदी राहाल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील.
मकर:- अभिमानास्पद कामगिरी कराल. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल.
कुंभ:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. कोर्ट कामातून त्रास संभवतो.
मीन:- अत्यंत अनुकुल दिवस आहे. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील.आनंदी राहाल. कायदेशीर कामे करा.








