नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूलच्या नवीन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, नंदुरबार जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचे सचिव युवराज पाटील, नंदुरबार तालुका शिक्षण संस्था चालक संघाचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, एस. ए. एम. ट्रस्ट नंदुरबार चे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी , एस. ए. एम. ट्रस्ट नंदुरबारचे चेअरमन रेव्ह. जे. एच. पठारे एस. ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबारच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी
एस. ए . मिशन इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक संदेश यंगड,पर्यवेक्षिका रोहिणी वळवी व पर्यवेक्षिका संगीता रघुवंशी उपस्थित होत्या. शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवाप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते चॉकलेट व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
नवीन शैक्षणिक इमारत अद्ययावत व मनोरंजक शैक्षणिक साधनांनी परिपूर्ण अशी असून नृत्य ,संगीत , खेळ, कला कार्यानुभव अश्या सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण नक्किच मिळेल असे गौरवोदगार आ.डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
एस.ए.एम.ट्रस्ट चे कार्यकारी संचलक डॉ. राजेश वळवी यांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच डॉ. सुधीर तांबे यांनी एस.ए. मिशन मराठी प्रायमरीला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले . या प्रसंगी शाळेच्या मुख्याद्यापिका सुषमा काळू यांनी डॉ . सुधीर तांबे स्वागत करून आभार व्यक्त केले.