तळोदा l प्रतिनिधी
शहादा शहरालगत असलेल्या हनुमान टेकडी वर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने वर्धापन दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने
महिला जिल्हा समन्वयक सौ.सीमा सोनगीर व शिला मराठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार उदयसींग पाडवी व महिला विभागीय अध्यक्ष सौ.अनिताताई परदेशी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी मा.शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कशी व कशासाठी करण्यात आली हे सागितले.तसेच सौ.अनिता परदेशीनी वृक्षारोपणाचे महत्त्व सागितले.
तसेच महिला ना एकत्रीत येऊन चांगले काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा भरात उभे करण्यासाठी मार्गदर्शन केले.तसेच डॉ.तुषार सनसे डॉक्टर सेल प्रदेश समन्वयक,योगेश परदेशी,केसर्सिंग क्षत्रिय यानी ही मार्गदर्शन केले. वट वृक्षा च्या झाड लावुन वृक्षारोपणच्या कार्यक्रमा ची सुरुवात करण्यात आली.
यावेळेस तळोदा तालुकाध्यक्ष डॉ.पुंडलीक राजपुत, तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे,पालिका बांधकाम सभापत तळोदा हितेंद्र क्षत्रिय,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आघाडे ,शोभाताई पाटील,रेखा तिरमले, नर्गिसताई ,यशोदा गिरासे, व महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या. यावेळेस प्रस्तावना सौ.सीमाताई सोनगरे यांनी केले तर आभार शिलाताई मराठे यांनी केले.