नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथील मातंग समाजाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होवून नंदुरबार जिल्हा मातंग समाजाची कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. मातंग समाजाच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण रामा अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नंदुरबार जिल्हा मातंग समाजाची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन बैठकीला सुरुवात करण्यात आली. या बैठकीला नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, नवापूर येथील मातंग समाजबांधव उपस्थित होते. यावेळी समाजातील विविध विषयांवर चर्चा करुन विचारविनियम करण्यात आले. या बैठकीत नंदुरबार जिल्हा मातंग समाजाची नुतन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. मातंग समाजाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण रामा अहिरे, जिल्हा उपाध्यक्षपदी निलेश गायकवाड (अक्कलकुवा), नितीन गरुड (तळोदा), गणेश साठे (नंदुरबार), अशोक साठे (नवापूर), राहुल बेहडे (शहादा), सल्लागारपदी फकिरा पवार (शहादा), दिनेश खरात (अक्कलकुवा), रमेश खवळे (नंदुरबार), वसंत अहिरे (तळोदा), नवल थोरात (नंदुरबार), मधुकर पानपाटील (शहादा), गणेश पगारे (नंदुरबार), राजेंद्र पगारे (नंदुरबार) व खजिनदारपदी राजु लांडगे (नंदुरबार), सचिवपदी अनिल खैरनार (शहादा) यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस मातंग समाजबांधव उपस्थित होते. या बैठकीत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात आले.