नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील गताळी येथे दुचाकी अचानक अंगावर आणल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकावर चाकूने वार करुन दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील गताळी येथील दिलीप होण्या गावित यांच्या अंगावर शिरीषकुमार प्रताप गावित रा.गताळी ता.नवापूर याने त्याच्या ताब्यातील दुचाकी अचानक आणली याचा दिलीप गावित यांनी जाब विचारला.
याचा राग आल्याने दिलीप गावित यांना शिरीषकुमार गावित याने चाकूने पोटावर वार करुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ केली. याबाबत दिलीप गावित यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात शिरीषकुमार गावित याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप गावित करीत आहेत.