Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बॅण्ड पार्टीच्या वाहनाची दुचाकीला धडक, पती-पत्नी जखमी

team by team
June 4, 2022
in क्राईम
0
दुचाकींच्या धडकेत एक जखमी, एकाविरुद्ध गुन्हा आहे

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद चिखली फाटा येथे बॅण्ड पार्टीच्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील वडछील पुनर्वसन येथील मगन भिका वसावे व त्यांची पत्नी असे दोघे दुचाकीने (क्र.जी.जे.०५ ई ५५९७) धडगाव येथून वडछील पुनर्वसन येथे जात होते. यावेळी देवमोगरा बॅण्ड पार्टी विरपूर गावाचे वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून म्हसावद गावाजवळील चिखली फाट्याजवळ दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात मगन वसावे व त्यांच्या पत्नीला दुखापत झाली.

तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत मगन वसावे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुनिल बागुल करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

गहाण जमिन सोडविल्याच्या रागातून एकास मारहाण, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जाब विचारल्याच्या रागातून एकावर चाकूने वार

Next Post
आरोग्य विभागाचे कार्यालय फोडून संगणक लांबविले

जाब विचारल्याच्या रागातून एकावर चाकूने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add