नंदूरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षपूर्तीनिमित्त सेवा, सुशासन व गरीब कल्याण कार्यक्रमांतर्गत भाजपा महिला मोर्चा आयोजित आदिवासी महिला मेळावा सोमावल ता.तळोदा येथे संपन्न झाला.
या प्रसंगी महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्ष कार्यकाळाचा अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना पंड्या, जिल्हा उपाध्यक्ष शानुबाई वळवी, जिल्हा चिटणीस पायल मोदानी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम,
शहादा तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, महिला मोर्चा शहादा शहराध्यक्ष रोहिणी भावसार, महिला मोर्चा अक्कलकुवा तालुका अध्यक्ष मथुराताई वळवी, बचत गटाचे संगीताताई वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आभार प्रदर्शन महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष किन्नरी सोनार यांनी केले. यावेळी मेळाव्यास आदिवासी समाजातील महिलांची संख्या लक्षणीय होती.