नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत नवापूर तालुक्यातील निवडणूक विभाग क्र.52 चितवी व पंचायत समिती अंतर्गत अक्राणी तालुक्यातील निर्वाचक गण क्रमांक 29 असली रिक्त जागाची पोटनिवडणूकीसाठी रविवार 5 जून 2022 रोजी मतदान होणार आहे.
या निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे मतदान साहित्य शनिवार 4 जून 2022 रोजी रवाना करण्यात येणार आहे.
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील निवडणूक विभाग क्र.52 चितवी या निवडणूक विभागात व अक्राणी तालुक्यातील निर्वाचक गण क्र.29 असली या निर्वाचक गणात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयास 4 व 5 जून 2022 या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निर्गमित केले आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती मतदार संघातील ज्या गावांना मतदान केंद्र आहेत त्याठिकाणी तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. या दिवशी भरविण्यात येणारे आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.