नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एकाचा आज दि.3 जून रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यापासून एक ही रुग्ण नसल्याने जिल्हा कोरोना मुक्त झाला होता.दरम्यान नवापूर तालुक्यातील एकाचा आज
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर इसम याचा अहवाल मुंबई येथे तपासण्यात आला होता.सध्या तो मुंबई येथे होम आयसोलेशन आहे.
दरम्यान राज्यात कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.