नंदूरबार l प्रतिनिधी
कोविड १९ कालखंडामुळे विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधारावर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अंतर्गत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कमाल पद्धतीने काही कृती घेऊन मुलांना मदत करण्याबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुटीतील शैक्षणिक उपक्रमा ( summer camp) राबवणे बाबत मे महिन्याच्या सुरवातीला जिल्हास्तर नियोजन करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाचा ध्येयदर्शी शाळापूर्व तयारी कार्यक्रम आपण राबवीत आहोत. त्यासोबतच त्याच स्वयंसेवकाच्या मदतीने FLN वर आधारित कृती घेतल्यास विद्यार्थ्यांना मदत होऊन पुढील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुलांच्या अध्ययनस्तरात वाढ होईल सदर कार्यक्रम हा पूर्णतः उत्स्फूर्तपणे सुरु असून सदरील उन्हाळी शिबीरामध्ये सर्वांचा सहभाग विद्यार्थी सेवा या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे.
या संदर्भात प्रथम संस्थेच्या मदतीने संवाद सभेचे नियोजन तालुकानिहाय नियोजन करण्यात आले सदर सुटीतील शैक्षणिक उपक्रम बाबत उत्स्फूर्तपणे सहभागासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण, नंदुरबार व जिल्हा परिषद नंदुरबार आणि प्रथम संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते.
जिल्हातील जवळपास ६०० गावामध्ये १०८४ स्वयंसेवकांनी उत्फूर्त सहभाग नोंदविला आहे. प्रथम संस्थेमार्फत सर्व स्वयंसेवकांची नोंदणी केली गेली त्यानंतर सर्वच स्वयंसेवकांना प्रशिक्षित करून गावपातळीवर शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे.
तसेच स्वयंसेवकांच्या मदतीने उन्हाळी शिबीर सुरु झाले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्तात्य टिकवून ठेवण्यासाठी मदत होत आहे. गावातील स्वयंसेवकांना सरपंच, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. जिल्हातील सर्वच गावात स्वयंसेवकांना आवाहन करण्यात येत आहे.
शिक्षणात पालकांचा व ग्रामस्थांच्या सहभाग वाढवावा तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन व प्रथम संस्थेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. सदरील अभियानात सहभागी स्वयंसेवकांना DIGITAL माध्यमासाठी तयार होणेबाबत कोर्सेस देखील दिले जात आहेत सहभागी सर्वांना याबाबत प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे.