नवापूर l प्रतिनिधी
शिरपूर-सुरत बस मध्ये नंदुरबार नवापूर दरम्यान गांजाची बॅग आढळून आली असून यावेळी 8 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर-सुरत बस मध्ये नंदुरबार नवापूर दरम्यान गांजाची बॅग सीटखाली आढळून आल्याने वाहकाने सदर बॅग नवापुर बस स्थानकावर वाहतूक निरीक्षक सचिन पाटील यांच्याकडे जमा केली.बस मधील प्रवाश्यांना दुसर्या बसने रवाना करण्यात आले.
सदर घटनेची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी दिली.त्यानंतर नवापूर आगार प्रमुखांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.पंचनामा केला.त्यात बस मधील आठ किलो वजनाचा सुका गांजा त्यांची किंमत ८० हजार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांनी दिली.
नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या पथकाने बसस्थानकावरून गांजा घेऊन पोलीस ठाण्यात नेले पोलिसांच्या कारवाईदरम्यान बसस्थानकावर मोठी गर्दी झाली होती.
बस मध्ये अशा पद्धतीने गांजा तस्करी सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गांजा तस्करी चे आंतरराज्य रॅकेट तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहे.