नंदुरबार | प्रतिनिधी
पश्चिम रेल्वे मार्गावर दि.८ जूनपासून सुरत-भुसावळ एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे.खा.डॉ.हिना गावीत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
सदर सुरत-भुसावळ एक्सप्रेस (क्र.१९००५/६) दि.८ जून पासून सुरू होत आहे. रात्री ११.१० वाजता सुरत येथून सुटेल. दुसर्या दिवशी सकाळी ७.१० वाजता जळगाव तर ७.५५ वाजता भुसावळला पोहचेल.
सदर एक्सप्रेस संध्याकाळी ७.३५ वाजता भुसावळहून सुटेल. रात्री ८.१० वाजता जळगावला येईल व दुसर्या दिवशी सकाळी पहाटे ५.१५ वाजता सुरतला पोहचेल.यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
दरम्यान सुरत भुसावळ एक्सप्रेस सुरू व्हावी यासाठी नंदूरबार लोकसभेच्या खा.डॉ.हिना गावीत यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.