Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ, पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी हे करा

team by team
June 3, 2022
in राष्ट्रीय
0
जिल्ह्यात 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ,  पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी हे करा

नंदुरबार l प्रतिनिधी
अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांस 2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण 6 हजार प्रति वर्ष लाभ अनुज्ञेय आहे.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मे 2022 रोजी शिमला येथे आयोजित गरीब कल्याण सम्मेलनात देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंच्या अकराव्या हप्त्याचे 10 करोड लाभार्थ्यांना 21 हजार करोड रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाख 30 हजार 92 लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. त्यात नंदुरबार 27 हजार 85, नवापूर 27 हजार 674, शहादा 31 हजार 698, अक्राणी 12 हजार 244, अक्कलकुवा 16 हजार 863 तर तळोदा 14 हजार 528 असे आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यास मदत झाली असून ऐन खरीप हंगामात या रक्कमेचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे.

पी.एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई- केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवासी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले असून, लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर ओटीपी पध्दतीने किंवा ग्राहक सेवा केंद्र (सीएसएस) केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ई केवायसी प्रमाणीकरण करु शकतील. तसेच आता पीएम किंसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वत:ची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे अधिक सहज आणि सोपी करण्यात आली आहे.

तरी, सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे तसेच ज्या लाभार्थीची पीएम किसान पोर्टलवरील माहिती चुकीची असल्यामुळे लाभाची रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा लाभार्थीनी आपले आधारकार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (7/12 इत्यादी) नजीकच्या तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषीसेवक यांच्याशी संपर्क साधून, माहिती अद्यावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे नवीन १२५ क्षमतेचे आदिवासी मुलां मुलींकरिता स्वतंत्र दोन वसतिगृह सुरु करा : आमश्या पाडवी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

January 14, 2026
सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन

सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन

January 14, 2026
नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

January 11, 2026
शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश चौधरी उपनगरध्यक्षपदी विजयी

शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश चौधरी उपनगरध्यक्षपदी विजयी

January 11, 2026
ॲड.राम रघुवंशी मित्र मंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

ॲड.राम रघुवंशी मित्र मंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

January 11, 2026
काळटोळमी येथे कृषी महाविद्यालयाच्या ‘रासेयो’ शिबिराची सांगता

काळटोळमी येथे कृषी महाविद्यालयाच्या ‘रासेयो’ शिबिराची सांगता

January 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add