म्हसावद l प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी)नंदुरबार यांच्यातर्फे आयोजित अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक युवती करिता एक महिना कालावधी नि:शुल्क (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री कढरे यांनी केले. तर जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी मिनाक्षी दांडवेकर यांनी देखिल प्रशिक्षणार्थिना बार्टी संस्थेच्या योजना mpsc/upsc स्पर्धा परिक्षा व इतर विषयावर मार्गदर्शन केले, तसेच बापू दादा गावाचे पोलीस पाटील यांनी कौशल्य विकास याविषयावर मार्गदर्शन केले.
सदरील प्रशिक्षण एक महिना कालावधीचा असुन त्यासाठी दोन जूनला उद्योजकता विकास प्रशिक्षण परिचय मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमासाठी व निवड मुलाखतीसाठी उद्योजकता विकास केंद्र,जिल्हा उद्योग केंद्र हाँल,नंदुरबार येथे संपर्क करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा प्रकल्प अधिकारी मिनाक्षी दांडवेकर व समतादूत ब्रिजलाल पाडवी, हेंमत करणकाले,मनिषा वलवी,कल्पना ठाकरे सारीका दहिवेलकर जयश्री कढरे यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल ठाकणे तर आभार प्रदर्शन हेंमत करनकाले यांनी केले.