शहादा l प्रतिनिधी
शहरातील पंचशील काॅलणीत घराच्या दुसरा माळावर रंगकाम करणारा ४९ वर्षीय प्रकाशा येथील इसमाचा उचदाबाचा विद्युत प्रवाहकडे ओडल्या गेल्याने शाॅक लागून खाली पडल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय दुल्लभ सामुद्रे (४९) रा.प्रकाशा, ता शहादा हा इसम दि २ जुन रोजी सकाळी ९:३० हाकेच्या सुमारास शहादा येथील नानाभाऊ डोंगर आखाडे यांच्या घराच्या दुसरा माळावर रंगकाम दोन मजुरांना सोबत घेऊन करत होता दरम्यान १०:२० वाजेच्या सुमारास वरच्या माळेच्या बाहेरील बाजू रंगकाम करत असतांना
घरा लगत जाणाऱ्या उच्चदाबाचा विद्युत प्रवाहाकडे ओडला गेल्यामुळे शाॅक लागून खाली पडल्याने जागी दुदैवी मृत्यू झाला . या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर इसमाच्या पश्चात आई, पत्नी , 24 वर्षीय मुलगा,
22 वर्षीय मुलगी असा परिवार आहे.
शहादा शहरात शवविछेदन करण्यासाठी पालिकेच्या दवाखान्यात डाॅक्टर नसल्यामुळे म्हसावद ग्रामीण रूग्णालयात घेऊन जावे लागत असल्यामुळे मयताची हेळसांड होऊन संबंधित नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे लागत असते. लोक प्रतिनिधी व शासकीय पातळीवरील वरिष्ठांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देणे गरजे आहे.