नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील डोकारे साखर कारखान्याजवळ पत्नीसोबत फोनवर का बोलतो असे विचारल्याचा राग आल्याने एकास काठीने मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यतील नवागाव येथील धर्मा तुकाराम वसावे यांनी शैलेश विना वळवी याला तु माझ्या पत्नीसोबत फोनवर का बोलतो असे विचारले. याचा राग आल्याने धर्मा वसावे यांना शैलेश वळवी याने काठीने मारहाण केली.
तर मुगल्या गुरुजी वळवी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत धर्मा वसावे यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, २३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.तेरसिंग वसावे करीत आहेत.








