नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील शेतगाव येथे नळाचे पाणी का अडवून ठेवता या कारणावरुन आई व मुलास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील शेतगाव येथील विमलीबाई रमेश गावित यांनी सुनिता गिरीष गावित यांना नळाचे पाणी घरासमोरुन नालीत का जाऊ देत नाही नळाचे पाणी का अडवून ठेवता असे सांगितले.
याचा राग आल्याने विमलीबाई गावित यांना निखील गिरीष वसावे याने दगड गालावर मारुन दुखापत केली. रेवजी रुबा गावित, साहिल शिवाजी गावित व सुनिता गिरीष गावित यांनीही शिवीगाळ करीत दमदाटी केली.
यावेळी विमलीबाई गावित यांचा मुलगा नितेश हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली. याबाबत विमलीबाई गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत वळवी करीत आहेत.








