नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बारी गावाच्या शिवारात नाल्याच्या कडेला सागवानी लाकडाचा अवैधरित्या साठा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाड टाकली असता सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे १९ सागवानी चौपाट आढळून आले. सागवानी चौपाट जप्त करण्यात आले असून शासकीय वाहनात भरून वाहतूक करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आले आहे.
नवापूर तालुक्यातील बारी गावाच्या शिवारात नाल्याच्या कडेला सागवानी लाकडाचा अवैधरित्या साठा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाड टाकली असता सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे १९ सागवानी चौपाट आढळून आले. सदरचे लाकूड जप्त करण्यात आले असून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आले आहे.
सदर कारवाई धनंजय पवार सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव ) नंदुरबार व स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल नवापूर, प्रा. वर्षा चव्हाण वनक्षेत्रपाल नंदुरबार प्रादेशिक, शिवाजी रत्नपारखे वनक्षेत्रपाल चिंचपाडा, प्रा. सुनंदा वेंदे वनपाल नांदखें, प्रकाश पवार वनपाल रोहयो, के. एम. बडूरे वनपाल कामोद, शितल तोरवणे वनपाल सोणखांब, संजय बडगुजर, भिवाजी दराडे वनपाल खेकडा, सुनिता पाटील वनपाल वडकळंबी, ए. एम शेख वनपाल बोरझर, वनरक्षक कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, विकास शिंदे, संतोष गायकवाड, लक्ष्मण पवार, अनिल
वळवी, अमोल गावीत, गिरीश वळवी, अशोक पावरा, पिकी बडगुजर, भाग्यश्री पावरा, सुनील करवंदकर, बिलाल शहा, भूपेश तांबोळी, भानुदास वाघ, अरविंद निकम, पुनम सोनवणे, प्रतिभा पवार,
रेखा गिरासे, कविता गावीत, रामदास पावरा, आशितोष पावरा, दीपा कापडणे, मनीषा जाधव, देवमन सूर्यवंशी, तुषार नांद्रे, वाहन चालक आबा न्याहळदे, दिलीप गुरव, चमाऱ्या गावीत, लालु पवार, रवी गिरसे, वनमजूर बाळा गावीत, दिनेश गावीत यांनी सहभाग घेतला.








