म्हसावद l प्रतिनिधी
शहादा-तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून शहादा तालुक्यातील जाम ग्रामपंचायत येथील मेन रोड ते शेताकड़े जाणारा 2 किलोमीटर शेत शिवार रस्ता आपल्या स्थानिक विकास निधीतून काम करण्यात आले आहे.

शेताकडे जाणारा शेतशिवार रस्ता बरेच वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत होता पावसाळ्याच्या दरम्यान शेतकऱ्यांना येणे जाणे त्रासदायी झाले होते.
बैलगाडी व दुचाकी येणे जाणे वाहतुकीस शक्य होत नव्हते अतिशय 1 किलोमीटर पर्यंत शेतकऱ्यांना खते बियाणे अवजारे खांद्यावर घेऊन जावे लागत होते.
याबात ग्रामपंचायत ने ठराव करून प्रस्ताव तयार करून आमदार राजेश पाडवी यांना देण्यात आले त्यानंतर तातडीने त्या कामाची दखल घेऊन आमदारानी लगेच मंजुरी देऊन शेतशिवार रस्ता करून दिले.
शिवार रस्ता करून दिल्याबद्दल आमदार राजेश पाडवी यांचे जाम ग्रामस्थांनी आभार व्यक्त करीत आहे. या कामी जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण,सरपंच,सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ यांनी परिश्रम घेतले.









