Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारची छोटी चित्रनगरी : “बटरफ्लाय’ हा हिंदी लघू चित्रपट, 29 मे रोजी होणार  छ.शिवाजी नाटयगृहात प्रदर्शित

team by team
May 28, 2022
in राज्य
0
नंदुरबारची छोटी चित्रनगरी : “बटरफ्लाय’ हा हिंदी लघू चित्रपट, 29 मे रोजी होणार  छ.शिवाजी नाटयगृहात प्रदर्शित

नंदुरबार l प्रतिनिधी
डॉ सुजित पाटील यांनी कमी खर्चात उच्च दर्जाची निर्मिती करीत निर्माण केला “बटरफ्लाय’ हा हिंदी लघू चित्रपट, 29 मे रोजी  छ.शिवाजी नाटयगृहात प्रदर्शित होणार आहे.

डॉ. सुजित पाटील दिग्दर्शीत “बटरफ्लाय” हा हिंदी लघू चित्रपट तयार करण्यासाठी तीन महिने लागले असून 43 मिनिटांचा हा लघूपट  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात दाखवला जाणार आहे.

डॉ. पाटील व त्यांच्या टीमने अथक मेहनत घेऊन सिनेमा तयार केला असून नागपूर,मुंबई, पुणे या भागातील कलावंतांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या आहेत. कमी खर्चात उच्च दर्जाची कलाकृती निर्माण करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न कुठलाही अनुभव नसतांना नंदुरबारचे कलावंत करीत असल्याने नंदुरबारची ओळख छोटी चित्रनगरी अशी होऊ पहात आहे.

येत्या 29 मे रोजी नंदुरबारच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिरात सायंकाळी ६ वाजता 43 मिनिटांचा हा चित्रपट स्क्रीनवर दाखवला जाणार आहे. तसेच विविध फिल्म महोत्सवात चित्रपटाची प्रवेशिका सादर करण्यात येणार आहे.

विपरीत, काश नंतर आता बटरफ्लाय या सिनेमाकडे खानदेशातील कलांवतांचे लक्ष लागून आहे.

डॉ.राजकूमार पाटील सह अनेक डॉक्टरांनी यात भुमिका वठवल्या आहेत. त्यामुळे बटरफ्लाय पाहण्यासाठी उत्सूकता ताणली गेली आहे. तीन कॅमेरामॅन तसेच विविध तांत्रिक टीमने उत्तम असे काम केले  आहे.

सर्वच कलावंतांनी जीव ओतून काम केल्याने हा सिनेमा भावनिक पातळवर यशस्वी झाला आहे. काही मोजक्या प्रेक्षकांना या सिनेमाचा रिव्हयू दाखवण्यात आला. त्यांना हा सिनेमा खूप आवडला.

डॉ.सुजित पाटील म्हणाले, डॉ राजकुमार पाटील यांच्यासह शहरातील अनेक डॉक्टर मित्रांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे चित्रपट पुर्ण होऊ शकला. चित्रपटाची कहानी छोटया कुटुंबाभाेवती फिरते. ती प्रेक्षकांना आवडेल,असे वाटते.

डॉ राजकुमार पाटील म्हणाले, मला अभिनय करतांना खूप आनंद वाटला. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहतोय. तसेच प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.

अभिनेते रणजित राजपूत म्हणाले, डॉ सुजित पाटील,डॉ राजकुमार पाटील या दोघांनी मला संधी दिली.त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केलाय. आता प्रेक्षक मायबापच आपली प्रतिक्रीया देतील. पण सिनेमात काम करतांना खूप मजा आली. सर्वच सहकारी कलावंतांनी आपली भुमिका छान वठवली. तसेच कलावंत नसणारे अनेकांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडूनही अभिनय करवून घेण्यात आला. त्यामुळे सामान्यांचे सिनेमात काम करण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे.

डॉ.जयंत शाह,डॉ. प्रकाश ठाकरे, डॉ व़ृषाली पाटील,डॉ. जैन, प्रशंसा तवर,कामिनी भोपे,नागसेन पेंढारकर ,पुनम भावसार ,अरूण सोनार ,दिलीप सोनार,आदींसह अनेक कलावंत या सिनेमात दिसतील.

बातमी शेअर करा
Previous Post

करणखेडा गुजरजांभोली रस्त्यावर दुचाकी घसरल्याने ठार

Next Post

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलीसांचा दणका

Next Post
गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलीसांचा दणका

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलीसांचा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add