नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील करणखेडा गुजरजांभोली रोडवर दुचाकी घसरल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील अरबाजखान इमाम खान हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एमएच ३९ एई ६६२१)घेवून जात असतांना त्याच्या मागे सैय्यद जुनेद सय्यद याला बसवून जात होता.
नंदुरबारकडून गुजरभवालीकडे जात असतांना करणखेडा गावाजवळ दुचाकी घसरल्याने अपघात घडला.अपघातात सैय्यद जुनेद सय्यद यास दुखापत झाली आहे.अरबाज खान इमाम खान यास गंभीर दुखापत झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पानाजी वसावे यांच्या फिर्यादीवरुन मयत दुचाकीस्वार अरबाजखान इमाम खान याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पानाजी वसावे करत आहेत.









