नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील करण चौफुली परिसरातून व अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी गावातून अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या घटना घडल्या आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरातून अजय गोपाल चौहान याने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले.
याप्रकरणी संशयित अजय चौहान याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच अक्कलकुवा तालुक्यातील एका १७ वर्षीय युवतीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेले.याबाबत अज्ञाताविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









