म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार स्पोर्ट्स कराटे असोसिएशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या उन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबिराचे समारोप कार्यक्रम समाज मंदिर,वृंदावन नगर, शहादा येथे समाप्त झाला .
या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील व माजी नगराध्यक्ष करुणा पाटील, नगरसेवक संदीप पाटील,माजी नगरसेवक के.डी.पाटील , प्रा.डॉ.अरविंद कांबळे, असोसिएशनचे सचिव डॉ.दिनेश बैसाणे, प्रा.डॉ.मयुर ठाकरे या सर्वांनी उपस्थिती दर्शवली होती .
५ मे ते २० मे दरम्यान शहादा येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आले या दरम्यान खेळाडूसाठी कराटे, कोरियन कराटे,सिकाई मार्शल आर्ट्स आदी. या खेळाचे आयोजन करण्यात आले होते .मुलांनी शिक्षणा सोबतच मैदानी खेळा कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे स्पोर्ट्स मध्ये ही करियर घडवता येऊ शकते, मुला मुलींन मध्ये खूप कौशल्य असते.
जर योग्य वेळात मार्गदर्शन भेटले तर ते नक्कीच पुढे स्पर्धेत टिकू शकतील, भाषणात श्रीमती सुनंदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थीनी आपला सहभाग नोंदवला होता,
या समारोप कार्यक्रमात शिबिरातील विद्यार्थ्यांनी कराटेचे प्रात्यक्षिक प्रदर्शित केले, या नंतर खेळाडूना मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या १५ दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरासाठी कराटे प्रशिक्षक शुभम कर्मा यांनी मार्गदर्शन केले, सूत्र संचालन प्रा.डॉ.मयुर ठाकरे तर आभार करण निकुंबे व कमलेश कुडके यांनी केले .